लिंगायत,मुस्लीम व धनगर समाजाच्या प्रलंबीत मागण्यांसाठी तहसीलवर धडक मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरुर अनंतपाळ

लिंगायत,मुस्लीम व धनगर समाजाच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयवर तीन्ही समाजांचा एकत्रीत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून त्यास स्वतंत्र धर्माची मान्यता मिळाली पाहिजे, लिंगायत समाजास अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा या लिंगायत समाजाच्या मागण्या आहेत. आरक्षण व संरक्षण आणि महेमदुर रहमान,रंगनाथन मिश्र, सच्चर समितीच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात या मुस्लीम समाजाच्या मागण्या आहेत. तर एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही धनगर समाजाची प्रमुख मागणी आहे. या व अन्य सर्व मागण्यांसह तीन्ही समाजांचा एकत्रीत मोर्चा शहरातील बसवेश्वर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निघणार आहे. लिंगायत,मुस्लीम व धनगर समाजातील तालुक्यातील शेकडो समाजबांधव या या मोर्चात सहभागी होणार आहेत.