
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
कडकडीत उन्हात अचानक ढगांचे आक्रमण…वीजांच्या चमचमाट करत गडगडाटासह पावसाने आगमन करावे अशी स्थिती शुक्रवारी रत्नागिरीत दुपारनंतर पहायला मिळाली. विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा झलक द्यायला सुरुवात केली आहे. बुधवारपासून रत्नागिरीत पावसाने सुरुवात केली आहे.

शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. पाऊस सुरु होण्यापूर्वीच वीज गायब झाली. यंदाच्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 3,335 मिमी पाऊस पडला आहे. या आकडेवारीवरुन पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे.
































































