जळगाव – वीज कोसळून एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जण जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातीमध्ये वीज कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भवरखेडे येथे शेतात काम करत असलेल्या कुटुंबावर अचानक वीज कोसळली आणि पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

रघुनाथ दशरथ पाटील (67), त्यांच्या पत्नी अलका रघुनाथ पाटील (60), कल्पना श्यामकांत पाटील (35), शोभा भागवत पाटील (50) आणि लता उदय पाटील (वय35) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यातील पहिली चार नावं एकाच कुटुंबातील आहेत.

गुरुवारी दुपारच्या सुमारास पाचही जण शेतात बाजरी कापत असतात अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाटी त्यांनी शेतातील एका झाडानजीक झोपडीत आसरा घेतला. याचदरम्यान विजांचा जोरदार कडकडाट झाला व वीज झोपडीवर कोसळली. त्यात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.