
रावेर तालुक्यातील सुलवाडी येथे एका 32 वर्षीय महिलेवर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आशाबाई राजेंद्र महानुभाव असे महिलेचे नाव आहे. त्या शेत कामासाठी स्वतःच्या शेत गट क्रमांक 129 मध्ये काम करत असताना सकाळी 11 ते 12 दरम्यान अचानक वादळीवऱ्यासह विजेच्या कडकडाटासहने पावसाला सुरुवात झाली. पावसापासून वाचण्यासाठी सदर महिला ही लिंबाच्या झाडाखाली गेली असता तिच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती निंभोरा पोलिसांनी मिळताच घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनि महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बापु पाटील करीत आहे.





























































