जालना – वीज पडून तिघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

888

जालना तालुक्यातील सेवली येथे शेतात वीज पडून तीन जण ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

सेवली येथील बाबासाहेब पुंजाराम भागडे यांच्या शेतात सोयाबीन काढणीचे काम चालू होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या मजुरांवर वीज कोसळली. यामध्ये गयाबाई गजानन नाईकनवरे (35), संदीप शंकर पवार (30), मंदाबाई नागोराव चाफळे (35) हे जागीच ठार झाले. तर सुमनबाई पुंजाराम भागडे, सुनिल संदीप पवार व सचिन नागोराव चाफळे हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच सेवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास मोरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या