सेनगाव येथे लाईनमनची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सेनगाव

सेनगाव येथील वीज महावितरण कंपनीत कार्यरत असलेले लाईनमन सुमीत बालाजी थडवे ( वय28) यांनी सेनगाव शहरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सेनगाव येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये सुमित थडवे हे लाइनमन म्हणून नोकरीला होते. कोळसा व इतर गावासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते मूळचे नांदेडच्या सराफाबाजार भागातील रहिवासी होते. रविवारी सेनगाव येथील रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. थडवे विवाहित असून त्याना एक मुलगी आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही.या प्रकरणी सेनगाव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.