दहशतवाद्यांशी ‘लिंक’, कश्मीरात 700 जणांना पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरात सहा दिवसांत सात नागरिकांच्या झालेल्या हत्येप्रकरणी सुरक्षा दलांनी संशयितांना ताब्यात घेण्याची मोठी धडक मोहीम हाती घेतली आहे. दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या 700हून अधिक जणांना पकडण्यात आले आहे. यातील अनेकजण जमात-ए-इस्लामी ग्रुपशी संबंधित आहेत. श्रीनगर, गंदेरबल, बुदगाम तसेच दक्षिण कश्मीराच्या विविध भागांत सुरक्षा दलांनी या कारवाईचा धडाका लावला आहे.

जवळपास 500 लोकांचे बंदी घालण्यात आलेल्या धार्मिक आणि दहशतवादी समुहांशी संबंध असल्याचा संशय आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले. जम्मू-कश्मीरमध्ये मागील सहा दिवसांत कश्मिरी पंडित, शीख व मुस्लिम समाजातील लोकांसह सात नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. दहशतवाद्यांनी घडवलेल्या या हत्यासत्रामुळे कश्मीर खोऱ्यात खळबळ उडाली आहे.