शरीराने साथ दिली तर आगामी विश्वचषक खेळेन – मेस्सी

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आगामी फिफा विश्वचषकात खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. 2022 च्या फिफा विश्वचषकात निर्णायक खेळी करून आपल्या देशाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या मेस्सीने 2026 च्या विश्वचषकाबाबत एक मोठे विधान केले आहे. शरीराने साथ दिली तर नक्कीच आगामी विश्वचषक खेळेन, असे 38 वर्षीय मेस्सीने एका मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले.

मेस्सी सध्या एमएलएस क्लब इंटर मियामीकडून खेळतो. त्याने 2004 मध्ये त्याच्या व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी बार्सिलोना संघाकडून पदार्पण करणाऱ्या मेस्सीने अवघ्या फुटबॉल विश्वाला आपल्या चपळतेने प्रभावित केले. तो कुन्हा एकदा फिफा विश्वचषकासारख्या मोठय़ा व्यासपीठावर दिसणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

‘आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना विश्वचषकासारख्या मोठया स्पर्धेत खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मला 2026 च्या विश्वचषकात खेळायला नक्कीच आवडेल, मात्र कुढच्या वर्षी स्पर्धेच्या तयारीला सुरुवात झाल्यानंतर शरीर किती साथ देते हे पाहावे लागेल. मी संघासाठी 100 टक्के उपयुक्त असेल तरच खेळण्याचा निर्णय घेईन. गेल्या विश्वचषकात आम्ही विजय मिळवला होता. त्यामुळे ट्रॉफीचा बचाव करणे हा एक चांगला अनुभव असेल.’  – लिओनेल मेस्सी