मंत्रालयात दारूच्या बाटल्या, सामान्य प्रशासन विभागाचे चौकशीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्याने आज खळबळ उडाली. मंत्रालयात या बाटल्या आल्याच कशा? असा सवाल उपस्थित केला जात असून या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

नवीन मंत्रालय इमारतीत उपाहारगृहाच्या बाजूला तळमजल्याच्या आसपास अडगळीत दारूच्या बाटल्या असल्याचे निदर्शनास आल्यावर तत्काळ त्या बाटल्या हटवण्यासाठी मंत्रालय प्रशासनाच्या वतीने पावले उचलली गेली. मंत्रालयात अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था असते. जागोजागी सीसीटीव्ही पॅमेरे आहेत. अशा ठिकाणी दारूच्या बाटल्या आल्या कुठून तसेच ही दारू रिचवणारे तळीराम कोण याचा शोध घेण्यात येणार आहे. या प्रकाराबाबत सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत बोलताना भरणे म्हणाले की, या बाटल्या येथे कशा आल्या? तसेच यामध्ये दोषी कोण आहे? या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.