रांगा लावून दारू घेता, मात्र मुलांची फी भरण्यासाठी पैसे नाहीत? शाळेच्या मुख्याध्यापकांचा बेवड्यांना खणखणीत सवाल

1373

दारूची दुकाने सुरू करण्याला परवानगी मिळाल्याची बातमी दारूप्रेमींमध्ये वाऱ्य़ाच्या वेगाने पसरली. यानंतर देशातील अनेक भागांमध्ये दुकानांबाहेर दारू खरेदीसाठी अभूतपूर्व गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंग ना पाळता लोकं बेभान झाल्यासारखी दारू खरेदी करत असल्याचे दृश्ये पाहायला मिळत होती. हे पाहून एका मुख्याध्यापकाने ‘लोकांकडे दारूसाठी पैसे आहेत मात्र मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत’ असे संतप्त उद्गार काढले आहेत.

हे वाचलेत का ? – मुंबईतील दारूची दुकानं बंद, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचा आदेश

कर्नाटकामध्ये सोमवारी अवघ्या काही तासात 45 कोटी रुपयांची दारू विकली गेली. मंगळवारी यात चार पटीने वाढ झालेली पाहायला मिळाली. तिथे बिअर वगळचा 182 कोटींची दारू विकली गेली होती. बिअरबाबत बोलायचे झाले तर मंगळवारी 15 कोटींची बिअर विकली गेली. ही परिस्थिती पाहिल्यानंतर कर्नाटकातील ब्लॉसम शाळेचे मुख्याध्यापक शशीकुमार म्हणाले की “आतापर्यंत फारतर 2 टक्के विद्यार्थ्यांच्याच पालकांनी त्यांच्या पाल्याची फी भरलेली आहे. शाळेने फोन केला तर फी न भरणारे पालक फोनही उचलत नाहीत. फोन घेतला तर ते सरळ सांगतात आम्ही आत्ता फी भरू शकत नाही सोमवारी मी दारूच्या दुकानाबाहेरीला रांगा पाहिल्या. मला खात्री आहे की त्यातील अनेकांची मुले शाळेत जाणारी असतील. या लोकांकडे रांगा लावून दारू विकत घ्यायला पैसे आहेत मात्र त्यांच्या पाल्याची फी भरण्यासाठी पैसे नाहीत ?”. ज्या शशीकुमार यांनी हे उद्गार काढले आहे ते तिथल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संघटनेचे सरचिटणीस आहेत. कर्नाटक मिररने दारूसाठी लागलेल्या रांगाबाबत प्रतिक्रिया विचारली होती, ती देत असताना शशीकुमार यांनी हा संताप व्यक्त केला आहे.

हे वाचलेत का ? – दिल्लीत दारूवर 70 टक्क्यांचा कर, तरीही लोक म्हणतात हरकत नाही! पाहा व्हिडीओ

कर्नाटकामध्ये 23 एप्रिल रोजी एक आदेश जारी केला ज्याद्वारे शाळा ज्या पालकांना फी भरणे शक्य आहे त्यांच्याकडून फी घेऊ शकतात असे सांगण्यात आले होते. यामुळे शिक्षकांचे पगारही न देऊ शकलेल्या अनेक खासगी शाळांना दिलासा मिळाला होता. देशात पहिल्यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता तेव्हा शाळांना सूचना देण्यात आल्या होत्या की पालकांकडून पुढच्या शैक्षणिक वर्षासाठीची फी घेऊ नये. हा आदेश गेल्या महिन्यात तिथल्या शिक्षण विभागाने फिरवला होता.

शशीकुमार यांनी म्हटलंय की जर मी दारूच्या दुकानाबाहेर रांगेत उभा राहिलो तर मला 40 टक्के पालक दारू खरेदी करताना दिसतील. मात्र तेच पालक फी भरताना कटकट करत असतात. राज्य सरकारकडून शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत जो परतावा मिळतो तो देखील शाळांना मिळालेला नाहीये. पालक फी भरत नाहीयेत, ती भरायला सांगितली तर पालक शक्य नाही म्हणून सांगतात मग आम्ही करायचं काय असा हताश सवालही शशीकुमार यांनी विचारला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या