कारमधून विदेशी दारुची विनापरवाना वाहतूक, दोन जणांवर गुन्हा दाखल

309

कोपरगाव येथे सुदेश थिएटर परिसरात कारमधून विदेशी दारू विनापरवाना बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. लाल रंगाच्या मारुती अल्टो कारसह दोन क्वॉर्टर असा पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी 29 रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील मुख्य चौकात सुदेश सिनेमा गृहासमोर रोडवर कोपरगाव येथे लाल रंगाच्या मारुती अल्टो कार नं. MH 01 PA 4729 ही उभी केली होती. त्या गाडीत विदेशी दारुची विनापरवाना बेकायदा वाहतूक करण्याचा आरोपींचा मानस होता. मात्र, पोलिसांनी विदेशी दारूची बेकायदा वाहतूक तसेच दारु पिऊन गाडी भरधाव वेगात व धोकादायकरित्या चालवण्याच्या गुन्ह्यांतर्गत मच्छिंद्र काशिनाथ लोणारी (60), बाळासाहेब ठमाजी संवसरकर (43, दोन्ही रा. शिंगणापुर कोपरगाव) या दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडील 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

वरील दोन्ही आरोपींविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या