चंदिगडमध्ये आता पेट्रोल पंप, मॉलमध्ये दारू विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंदिगडमध्ये आता नवीन अबकारी धोरण जारी केले आहे. या धोरणानुसार, आता शहरातील पेट्रोल पंप आणि मॉलमध्ये दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. नव्या धोरणानुसार, मोठय़ा स्टोअर आवश्यक परवाना मिळवल्यानंतर विदेशी दारू, वाईन आणि बिअरची विक्री करू शकतील. बार, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये अल्कोमीटर लावणे आवश्यक असेल. एल-2डी लायसन्सअंतर्गत आता स्वीकृत बाजार, पेट्रोल पंप आणि मॉल्समध्ये कमीत कमी 300 वर्गफूट दुकानात वाइन आणि बिअरची विक्री केली जाऊ शकते. ई-लिलाव करून 11 ठेकेदारांकडून 62.38 कोटी रुपये मिळाले आहेत.