सूर तेच छेडिता… वर्क फ्रॉम होम चांगलं करण्यासाठी संगीत ऐका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगीतामध्ये किती ताकद आहे, हे आपण जाणतोच. म्युझिक थेरपीने रुग्णांना बरं करता येतं, याचा शोध यापूर्वीच लागलेला आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण वर्क फॉम होम करत आहेत. अशावेळी नोकरदारांना आपली कार्यक्षमता वाढवायची असेल तर त्यांनी नक्की संगीत ऐकावं. कोणत्याही प्रकारचं, तुमच्या आवडीचं संगीत घरातून काम करताना ऐका. तुमच्या कामात नक्की फरक पडेल, असं एका अभ्यासातून उघड झालं आहे.

वेब एफएक्सच्या एका शोधानुसार, जेव्हा लोक गाणं ऐकत काम करतात, तेव्हा ते जास्त आनंदी राहतात आणि जास्त प्रभावी काम करू शकतात.

  • मंद सुरावट – यामुळे डेटा एंट्रीचे काम चांगले होते. 92 टक्क्यांपर्यंत सुधारते.
  • नृत्य संगीत – प्रूफ रिडिंगचा वेग 20 टक्के इतका वाढू शकतो.
  • शास्त्रीय संगीत – कोणत्याही कामाची गुणवत्ता 12 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
  • पॉप म्युझिक – पॉप संगीत कामातील चूक 14 टक्क्यांपर्यंत कमी करू शकते. पॉप संगीत ऐकल्याने डेटा एंट्रीचा वेग 59 टक्क्यांपर्यंत वाढतो.