आयुष कुमारने लिहिले मुलांसाठी रामायण, लॉकडाऊनमध्ये टीव्हीवर रामायण बघून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यावेळी दूरदर्शनवरून रामायण मालिकेचे प्रसारण करण्यात आले. मालिका बघून ओडिशामध्ये राहणाऱया 10 वर्षांच्या आयुष कुमार खुंटीया याने मुलांसाठी रामायण लिहिले. 104 पानांची ही पुस्तिका आहे.

आयुष म्हणतो, माझ्या काकाने डीडी चॅनेलवरील रामायण बघायला आणि त्यावर लिहायला मला सांगितले. मी रामायणाचा प्रत्येक भाग बघितला आणि ओडिया भाषेत वहीत लिहून काढला. संपूर्ण पुस्तक लिहायला मला दोन महिने लागले. आयुषने रामायणातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख त्याच्या पुस्तकात केला आहे. श्रीरामाचा 14 वर्षांचा वनवास, सीतेचे अपहरण अशा घटना त्याने निवडल्या आहेत.