बारामतीत ‘पवार’ विरुद्ध ‘पडळकर’, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gopichand-padalkar

धनगर समाजाचे मोठे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गोपीचंद पडळकर हे ढाण्या वाघ आहे. ढाण्यावाघाने जंगलाच्या राजासारखं रहावं. त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून लढावं. त्यामुळे बारामतीमधून पडळकर यांना उमेदवारी द्यावी असे पक्षाशी बोलतो, यंदा बारामती जिंकूच असं म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केला.

  • आरक्षणाचा प्रश्न हा कोर्टात आहे, तो निर्णयही लवकरच लागेल अशी अपेक्षा आहे
  • आदिवासी समाजाप्रमाणे सर्व योजना धनगर समाजाला लागू केल्या
  • त्यांच्या सारख्या मोठ्या नेत्यांच्या आंदोलनानंतर आम्ही त्यांना बोलवलं
  • पडळकर यांनी स्वत:साठी नाही तर समाजासाठी मागितले
  • गोपीचंद पडळकर यांचं घरात स्वागत आहे- मुख्यमंत्री
  • काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश
  • धनगर नेते गोपीचंद पडळकर यांचा आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश
  • भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरूच राहणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती