महाराष्ट्रात 1 लाख 8972 चाचण्या, त्यापैकी 1 लाख 1162 नमुने निगेटिव्ह – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणू संदर्भात काय स्थिती आहे, कोणत्या उपाययोजना आखल्या जात आहेत. या बाबत निवदेन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्या संवादातील काही ठळक मुद्दे-

  • तुमचे आशीर्वाद हेच आमचं बळ आहे.
  • तुमची खबरदारी अतुलनीय, संयम अभूतपूर्व
  • हिंदुस्थान आत्मविश्वासावर आणि संयमावर कोरोनाचं युद्ध जिंकेल
  • कोरोनाचं युद्ध आपल्याला जिंकायचं आहे.
  • ही लढाई आता अटीतटीची आहे
  • टाटा, बिर्ला, रिलायन्स, महिंद्रा अशा सगळ्यांचे आभार
  • या सगळ्यात मदत करणाऱ्या उद्योगपतींचे आभार
  • एका बाजूला प्रयोग, रुग्णांना वाचवण्याची पराकाष्ठा करत आहोत
  • केंद्राशी सतत बोलणं सुरू आहे
  • घरी बसून कंटाळला असाल पण ईलाज नाही
  • हे संकट पूर्ण दुर्लक्षित न करता हळू हळू पूर्वपदाच्या दिशेने आपण पावलं टाकत आहोत
  • काही जिल्ह्यांमध्ये काही उद्योगांना परवानगी दिली आहे
  • फळफळावळ विक्रीवर बंधन नाहीत
  • कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आली आहे
  • यातील 70 ते 80 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.
  • पण, सगळ्या प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे.
  • आकडेवारीत चढ-उतार होतील
  • यापैकी  7628 इतके जण पॉझिटिव्ह रुग्ण, 323 मृत्यू
  • महाराष्ट्रात 1 लाख 8972 चाचण्या, त्यापैकी 1 लाख 1162 नमुने निगेटिव्ह आले आहेत
  • वरळीतील परिस्थिती हाताळल्याबद्दल केंद्राकडून कौतुक
  • मुंबईत कंन्टोन्मेंट झोन कमी होत आहेत
  • कोरोनाग्रस्तांसाठी मुंबईत ठिकठिकाणी केंद्र उभारण्यात आली आहेत.
  • त्यासाठी खासगी दवाखाने, डॉक्टर यांना सरकारकडून पूर्ण मदत मिळेल
  • कोरोना नसणाऱ्यांची गैरसोय होत आहे
  • सर्व वयाचे कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत आहेत. पण त्यासाठी लवकरात लवकर दवाखान्यात दाखल व्हा
  • सर्दी ताप खोकला अंगावर काढू नका, त्वरित फिवर क्लिनिक गाठा
  • रक्तदाब, मधुमेह आणि अऩ्य आजार असणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या
  • महाराष्ट्रात जिल्हांतर्गत हालचालींना सुरुवात
  • गर्दी टाळूनच पुढे जाता येईल
  • सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून शारीरिक अंतर राखा, मनात अंतर नव्हे
  • विषाणू आपल्या संयमाची परीक्षा बघत आहे
  • कोरोनाला रोखण्यासाठी गाफील राहून चालणार नाही
  • वर्दळ वाढवून चालणार नाही.
  • आपला महाराष्ट्र कोरोना मुक्त करायचा
  • चूक झाल्यास सांगा, सुधारणा सांगा अशी विनंती
  • केंद्राच्या पथकाकडे त्रयस्थपणे निरीक्षण करण्याची विनंती
  • केंद्राचं पथक आपल्याकडे मुक्कामी आहे
  • केंद्राकडे डाळ आणि गव्हाची मागणी
  • कोरोनाची कोणतीही परिस्थिती लपवलेली नाही
  • पण हे सगळं अत्यंत संयमाने करण्याची गरज आहे
  • शक्य होईल तेव्हा अनेक राज्ये एकमेकांच्या मदतीने पुढचा मार्ग काढतील
  • ट्रेन सुरू होणार नाहीत. मजुरांसाठी ज्या सूचना असतील त्या सरकारतर्फे मिळतील
  • त्यासाठी नितीन गडकरी यांचे आभार
  • अशा परिस्थितीत राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या बाजूने उभे राहण्याचं गडकरी यांचं आवाहन
  • केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही जण अजूनही राजकारण करत आहेत
  • मी या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवत आहे
  • सरकार एकही प्रयत्न करणं सोडत नाही आहोत.
  • लॉकडाऊनमुळे आपण कोरोनाचा गुणाकार रोखू शकत आहोत
  • लॉकडाऊनचे काही चांगले वाईट परिणाम आहेत
  • प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत
  • कुणाहीवर पटकन संशय व्यक्त करण्याआधी परिस्थितीचा विचार केला पाहिजे
  • हे दोन पोलीस कोरोना युद्ध लढता लढता शहीद झाले आहेत
  • पोलीस आपल्यासाठीच झटत आहेत.
  • आपण सगळेच परीक्षा देत आहोत
  • कोरोना लढ्यात बळी गेलेल्या दोन पोलिसांना श्रद्धांजली
  • आपल्या सेवेसाठी झटणाऱ्यांचा आदर करणं गरजेचं
  • आपल्यासाठी अहोरात्र झटणारे जे कुणी आहेत, त्यांच्यात देव आहे
  • तुम्ही जे संयम पाळताय त्यात देव आहे
  • मुस्लीम धर्मींयांनी आपले नमाज घरातच अदा करावेत, गर्दी करू नका
  • सर्वधर्मियांनी देशकर्तव्याला आणि माणुसकीला प्राधान्य दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
  • पण आपण लढा देत आहोत
  • हे दिवस किंवा हे संकट कुणालाच अपेक्षित नव्हतं
  • दिवस सगळे सारखे झाले आहेत.
  • सर्व दिनदर्शिका दीन झाल्या आहेत.
  • आज नेमकं काय आहे, हे नेमकं लक्षात येत नाही
  • अक्षय्य तृतीया आणि अन्य सणांच्या सर्वांना शुभेच्छा
  • कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची आणि त्यावरील सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी एक वाजता जनतेला संबोधित करत आहेत.