शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे- उद्धव ठाकरे

2495

तुम्ही आमचे अन्नदाते आहात. परिस्थिती दुर्दैवी असली तर खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना धीर दिला. संभाजीनगरातील कन्नड तालुक्यात कानडगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतेवेळी ते बोलत होते.

या भाषणाचे काही ठळक मुद्दे-

 • या संकटात शिवसेना तुमच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. आत्महत्या करण्याचा विचारही मनात आणू नका.
 • तुम्ही माझे कुटुंबीय आहात. तुम्हाला कुटुंबीय म्हणून वचन देतो.
 • परिस्थिती दुर्दैवी आहे. पण खचून जाऊ नका.
 • अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जर नोटिसा बजावत असाल तर त्या जाळूच पण, तुम्हालासुद्धा वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, कर्जवसुलीसाठी नोटिसा बजावणाऱ्या बँकाना उद्धव ठाकरे यांचा इशारा
 • पंचनाम्याची थेरं करू नका, शेतकऱ्यांना मदत करताना कागदपत्रांचा घोळ घालू नका. शेतकऱ्यांना थेट मदत द्या.
 • 10 हजार कोटी पुनर्वसनासाठी पुरेसे नाहीत.
 • जे धाडस कुणीही करणार नाही, ते धाडस तुम्ही करता.
 • माझा शेतकरी मर्द आहे. तो या संकटावर मात करेल.
 • माझी ताकद आत्महत्या करत असेल तर मी जगू कसा. म्हणून आत्महत्येचा विचार करू नका.
 • मी तुम्हाला न्याय द्यायला आलो आहे. आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. तुम्ही माझी ताकद आहात.
 • पावसाचं दुष्टचक्र आपल्या मागे लागलं आहे.
 • सध्या अन्नदाता संकटात आहे. हे काही महाराष्ट्राला शोभेसं चित्र नाही.
 • तुम्ही आमचे अन्नदाते आहात. तुम्ही कष्टाने कमवलेल्या अन्नावर आम्ही मजा करतो
 • मुंबईत बसूनही मला तुमची स्थिती कळली होती, पण मी नाटक करायला नाही तर तुम्हाला धीर द्यायला आलो आहे.
 • सरकार शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नसेल, तर असं सरकार काय कामाचं?
 • सरकारचं काय होईल ते होईल पण मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही.
 • मी तुमचा नेता म्हणून नाही तर तुमचा कुटुंबीय म्हणून आलो आहे.
 • फक्त तुम्ही खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
 • गेल्या चार पाच वर्षांपासून आपण दुष्काळाचा सामना करत आहोत, आताही करू.
 • शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे- उद्धव ठाकरे
 • निकष लावण्याआधी मदत द्या, शेतकऱ्यांचे उद्धव ठाकरे यांना निवेदन
 • अगोदर वीजबिल माफ करा. वीज तोडू नका
 • येथील शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी धीर दिला.
 • संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील कानडगाव येथे उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
 • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटून परतीच्या पावसाची पाहणी
 • अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार
 • उद्धव ठाकरे संभाजीनगर येथे विमानतळावर दाखल
 • या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
 • शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावर या ओल्या दुष्काळाने पाणी फिरवलं आहे.
 • पावसाची वाट पाहून थकलेल्या मराठवाड्याला आता ओल्या दुष्काळाने घेरलं आहे.
आपली प्रतिक्रिया द्या