मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा 2733 कोटींचा अर्थसंकल्प सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए. एल. जऱ्हाड यांनी आज दुपारी शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे महापालिकेचा 2019 – 20 या आर्थिक वर्षासाठीचा शैक्षणिक अर्थसंकल्प आज केला. यंदा 2733 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून यंदा 164.42 कोटींची वाढ झाली आहे. गत वर्षी 2569 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

प्रामुख्याने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मंडळ साठी प्राथमिक तरतूद 2.60 कोटी रुपये, विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य समृद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणीसाठी 1.30 कोटी रुपये, संगणक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्यय, सर्च प्रोग्रामिंग, प्रिंटिंग, इलेक्ट्रॉनिक रोबो, मोबाईल अॅप्स विकसित करण्याच्या सुविधा उपलबद्ध करण्यासाठी 1. 42 कोटी रुयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या वर्षी नव्याने विज्ञान कुतूहल भवनांची उभारणी केली जाणार असून त्यासाठी 1.20 कोटी देण्यात येणार आहे, हे भवन पूर्व व पश्चिम उपनगरात उभे राहणार आहे.

2019-20 च्या अर्थसंकल्पात असणाऱ्या महत्वाच्या नवीन योजना :

दर्जेदार/आंतरराष्ट्रीय शाळा 2.60 कोटी ची तरतूद

भाषा प्रयोगशाळा 1.30 कोटींची तरतूद

पाचवी ते आठविच्या विद्यार्थ्यांसाठी टिंकर लॅब 1.42 कोटींची तरतूद

क्रीडा अकादमी सुरू करणार त्यासाठी 3.76 कोटींची तरतूद

संगीत अकादमीसाठी 86 लाखांची तरतूद

विद्यार्थांना सुट्टीमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी बालभवन ची निर्मिती 12 लाख तरतूद

शाळांचे मूल्यमापन 20 लाख तरतूद

विद्यार्थांना समुपदेशन सेवा 1 कोटी

विद्यार्थी थेट अनुदान योजना विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्टेशनरी वस्तूंची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँकेत जमा होणार 19.69 कोटींची तरतूद

खेळांची साधने 2 कोटी ची तरतूद

विज्ञान कुतूहल भवन 1.20 कोटी

जलद इंटरनेटसह नवीन दूरध्वनी जोडणी 35 लाख तरतूद

शाळा माहिती व्यवस्थापन नियंत्रण 80 लाख