LIVE Rain update तुफान पाऊस आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
(फोटो - संदीप पागडे)

सामना ऑनलाईन, मुंबई

  • चकाला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी, व्हिडीओ व्हायरल

  • ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 4 वरील हा गर्दीचा व्हिडीओ आहे.
  • अनेक लोकल गाड्या रद्द झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
  • मुंबई आणि उपनगरांमध्ये तुफान पाऊस पडत आहे.

मुंबई-ठाणे-पालघरमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, सतर्कतेचा इशारा

  • मरीन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा. हाय टाईडचा इशारा
  • शीव रेल्वेस्थानकात पाणी साचल्याने लोकल पाण्यातून मार्ग काढत असल्याची दृश्य व्हायरल झाली आहेत
  • ठाणे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म 1 वाहतुकीसाठी बंद. मुंबई-ठाणे आणि परिसरात काल रात्रीपासून सतत पाऊस पडत असून त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. ठाणे स्थानकातील परिस्थितीची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी  विशाल अहिरराव
  • सामना ऑनलाईनचे प्रतिनिधी विशाल अहिरराव यांनी ठाणे स्थानकावरून दिली पावसाची सविस्तर अपडेट
  • सायन रेल्वेस्थानकात रुळांवर पाणी
  • मुसळधार पावसामुळे घेतला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
  • कुर्ला, सायन आणि माटुंगा परिसरातील बहुतांश शाळांनी जाहीर सुट्टी जाहीर केली आहे
  • डोंबिवलीच्या पुढे अप मार्गावरील वाहतूक संथ गतीने
  • या स्थानकांदरम्यान रेल्वेसेवा ठप्प
  • marin-lines-overhead
  • चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली
  • लौजी स्टेशन ते कर्जत दरम्यान मस्को कंपनी जवळची घटना
  • मुंबईला जाणारे चाकरमानी रखडले
  • खोपोलीजवळ रेल्वे मार्गावर झाड कोसळले
  • खोपोली ते कर्जत रेल्वेसेवा विस्कळीत
  • दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत आहे..
  • वलसाड फास्ट पॅसेंजर फ्लाइंग राणी यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत…
  • पालघरला आत्ता मध्यरात्री येणारी अवध एक्स्प्रेस येत आहे…
  • पालघर तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे
  • आज दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणे अपेक्षित आहे, आज दुपारपर्यंत (2pm) पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता
  • मुंबई पश्चिम उपनगर भागामध्ये रात्रभरात 361 मिमी पावसाची नोंद. तर पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान 100 मिमी पाऊस कोसळला
  • दादर, प्रभादेवी भागात मुसळधार पाऊस
  • पालघरमार्गे येणाऱ्या 9 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
  • पालघरमध्ये रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहूक ठप्प झाली आहे.
  • पालघरमध्ये मुसळधार पाऊस पड असून यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे.
  • पुणे मार्गाने मुंबईकडे येणाऱ्या गाड्या इगतपुरी स्थानकाद्वारे वळवण्या आल्या
  • भुसावळ-पुणे एक्सप्रेसचा प्रवास नाशिक स्थानकात समाप्त करण्यात आला आहे
  • इंद्रायणी,इंटरसिटी,डेक्कन,कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या
  • जामरुंग आणि ठाकूरवाडी स्थानकाजवळ डबे घसरल्याने वाहतूक विस्कळीत
  • मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतूक विस्कळीत
  • मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
  • मुंबई आणि उपनमगरात रात्रभर पावसाची संततधार