राहुल गांधींच्या समर्थकांची कारकिर्द संपवण्याच षडयंत्र, संजय निरुपमांचा आरोप

4654

#MahaElection विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा पत्ता कट झालेल्या काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पक्षातील वरिष्ठांवर गंभीर आरोप केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तिय असलेल्या कार्यकर्ते आणि नेत्यांची राजकीय कारकिर्द संपवण्याचे षडयंत्र रचलं जात असल्याचा खळबळजनक आरोप निरुपम यांनी कोणाचेही नाव न घेता केला.

 • पक्षातील वरिष्ठांना बदलत्या वाऱ्यांचा आढावा घ्यावा लागेल, अन्यथा पक्षाचं भविष्य धोक्यात येईल
 • मी निवडणूक प्रचारात सहभागी होणार नाही.
 • प्रत्येक पक्ष निवडणुकीचं तिकीट देण्याआधी पक्षाच्या कार्यकर्ते नेत्यांकडून प्रतिक्रिया मागवतो. पण, माझ्याकडून यावेळी कोणतीही प्रतिक्रिया मागण्यात आली नाही.
 • सध्या माझ्या मनात पक्ष सोडण्याचा विचार नाही, पण परिस्थिती अशीच राहिली तर मला नाईलाजाने पक्ष सोडावा लागेल.
 • माझ्याविरुद्ध पक्षात कारस्थानं केली जात आहेत.
 • माझ्यासारख्या कार्यकर्ते नेत्यांची गरज आता काँग्रेसला उरलेली नाही असं चित्र आहे.
 • राहुल गांधी यांच्या समीप असलेल्यांना दूर करण्याचं आणि त्यांची कारकिर्द संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे.
 • उमेदवारांच्या आधीच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून त्यांना तिकीट देण्यात आलं.
 • पण दिल्लीत बसलेल्यांना याची काहीही पर्वा नाही.
 • त्यामुळे मुस्लीम मतदार दुरावण्याची शक्यता आहे.
 • कुठे तीन उमेदवार तर कुठे एकही नाही, अशी परिस्थिती दिसत आहे.
 • मात्र, जाहीर झालेल्या उमेदवारीत अतिशय तफावत आहे.
 • मुस्लीम मतदार ही आपली व्होट बँक आहे.
 • प्रत्येक शहरात एक तरी मुस्लीम उमेदवार असावा, असं मी सुचवलं होतं.
 • नवीन पद्धतीने अनेक कार्यकर्ते किंवा नेत्यांची कारकिर्द धोक्यात येत आहे.
 • काँग्रेसमध्ये सध्या जुन्या कार्यकारी पद्धतीने काम केलं जात नाही
 • राहुल गांधी यांच्या निकट असलेले नेते आणि कार्यकर्त्यांची कारकिर्द धोक्यात आणणं हे एक षडयंत्र
 • संजय निरूपम यांची पत्रकार परिषद सुरू
आपली प्रतिक्रिया द्या