पहिली निवडणूक असल्यासारखे शिवसैनिकांनी लढावे -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  • इतर राज्यातील राज्य प्रमुख या मेळाव्याला उपस्थित होते.
  • याआधीही अनेकजण गेले आहेत, मोठे झालेले गेले आहेत पण मोठे करणारे आजही आपल्यासोबत आहेत.
  • ज्यांना जायचे असेल, त्यांनी खुशाल जावे, दरवाजे सताड उघडे आहेत.
  • कुस्तीची आमची पंरपरा आहेत..बघूया कोणाच्या पाठीला माती लागते.
  • हिंमत असेल तर महिन्याभारत मुंबई पालिकेची आणि त्याचसोबत विानसभेची निवडणूक घेऊन दाखवा.
  • तोडा- फोडा राज्य करा, ही नीती महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही.
  • मराठी-अमराठी करा, अनेक अमराठीही आमच्यासोबत आहेत गुजराती, उत्तर भारतीय आमच्यासोबत आहे.
  • तुमचे कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाही, हिंदू- मुस्लीम करा, आज मुस्लीमही शिवसेनेसोबत आहेत
  • आपण मर्द आहोत, आमण याच लढ्याची वाट बघत होतो. त्यासाठी आपण तयार आहोत.
  • आता पंतप्रधान, गृहमंत्री, सर्व यंत्रणा मुंबई निवडणुकीसाठी कामाला लागल्या आहेत.
  • करून दाखवले, आपण जे काम केले, ते जनतेपर्यंत पोहचवा.
  • आपली प्रत्येक शाखा सुरू राहिली पाहिजे, आणि तिथे गटप्रमुख असलेच पाहिजे, त्यांनी जनतेचे काम करावे.
  • आपल्याला पुन्हा भगवा फडकवायचा आहे.
  • आपल्याकेड काहीच नाही, असे समजून काम करा.
  • ही आपलीच पहिली निवडणूक आहे, असे समजून कामाला लागा.
  • मूठभर गद्दारांपैक्षा निवडक निष्ठावान मोलाचे आहेत.
  • शिवसेनेला लागलेल्या गोचीड आता गळून पडल्या आहेत.
  • गाईच्या आचळाला लागलेली गोचीड दूध नाही, रक्त पिते
  • संघर्ष झाला तर तो गद्दार आणि शिवसैनिकांमध्ये होणार आहे, कमळाबाईला तेच हवे आहे.
  • शिवसेनच्या वाटेला जाऊ नका, तसा प्रयत्न होतोय.
  • आपल्या शिवसैनिकांची मने मेलेली नाही, त्यांच्या मनगटात सळसळती ताकद आहे.
  • तुम्हाला तुमची शक्ती माहिती नाही, त्यांना तुमची शक्ती कळली आहे.
  • या एकत्र या, सगळ्यांना आपण अस्मान दाखवू
  • शिवसेनेला संपवण्याची भाषा ते करत आहेत.
  • राज्यातही लंपीचे संकट आहे, तेरोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात
  • पालघरमध्ये वेठिबिगारांची विक्री चालते, शेतकरी आत्महत्या करत आहेत.
  • असे करताना भ्रष्टाचाराविरोधात कोणत्या तोंडाने तुम्ही बोलतात
  • मतदान झाल्यावर तुमचा खोक्यांचा हिशोब चालतो.
  • न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे.
  • सर्वोच्च न्यायालयातील निकाल, हा देशात लोकशाही आहे की नाही, हेठरवणारा असेल.
  • भाजपने माणसे धुवायची लाँड्री काढली आहे काय
  • भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना पक्षात घेत ते भ्रष्टाचार कसा मिटवणार आहेत.
  • कोणी चांगले काम केले की, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे.
  • जगाला आपले कौतुक आहे, पण कमळाबाईला काही कळत नाही.
  • जगभरात धारावी मॉडेलचे नाव झाले.
  • जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. सुर्वोच्च न्यायालयानेही आपले कौतुक केले आहे.
  • ते त्या काळात आपण केले नसते, तर आज वळवळणारे सरकार वळवळले असते काय
  • त्यावेळी आपण प्रार्थनास्थळे उघडण्याएवजी आपण आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र, तपासणी केंद्र उघडत होतो
  • कोरोना काळात मंदिरे उघडण्यासाठी त्यांची मागणी होती,
  • कोरोना काळात प्राण वाचवणे, हा भ्रष्टाचार आहे, तर तो आम्ही पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही.
  • आम्ही जे इन्फ्रास्टक्टर उभे केले, तसे काम कोणी केली, हे दाखवून द्यावे, असे आमचे आव्हान आहे
  • पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस आपण आणल्या.
  • व्हर्च्युअल क्लासरुप ही शिवसेनेची संकल्पना आहे.
  • आज महापालिका शाळेत प्रवेश घेण्यासाठी रांग लागते, हे शिवसेनेचे यश आहे.
  • ही छत्रपती शिवाजी महाराज्याच्या राज्याची राजधानी आहे, झुकणार नाही, वाकणार नाही आणि मोडणारही नाही
  • आज माझ्याकडे तुमच्या आशिर्वादाची शक्ती आहे, त्या शक्तीने आम्ही पुढे जात आहोत.
  • आमच्या शाखा जनतेसाठी नेहमी खुल्या असतात, जनतेचे प्रश्न येथे सोडवले जातात.
  • त्या हल्ल्यात शिवसैनिक एसएसजी कमांडोसोबत दहशतवाद्यांशी लढत होते.
  • कसाबचा हल्ला झाला, त्यावेळी नरीमन पाँइट येथील शिवसैनिकांनी एनएसजी कमांडोना चहा, अन्न दिले.
  • मिंधे गट पुन्हा दिल्लीत मुजरा करायला गेला आहे.
  • कोणत्याही आपत्तीत शिवसैनिक सर्वात आधी धावून जातो.
  • मुंबईकर शिवसेनेवर विश्वास ठेवतात, त्यांना हा आधार आहे, शिवसेना हा विकास आहे.
  • हा प्रश्न दिल्लीत ठणकावून का विचारत नाही
  • महाराष्ट्रातून उद्योग निघून जात आहेत.
  • वेदांत गेला, यावर आता राजकारण करत आहेत.
  • धारावी आर्थिक केंद्र झाले पाहिजे, ते आम्ही करून दाखवणार
  • मुंबई त्यांच्यासाठी फक्त जमीन आहे. त्यामुळे ते मुंबईच्या विकासाच्या प्रकल्पाला स्थगिती देत आहेत.
  • वंशवादावर टीका करणाऱ्यांनी स्वतःचा वंश बघावा.
  • आमची 25 वर्षे वाया गेली.
  • संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ नव्हताच
  • आज आपण त्यांना कमळाबाई म्हणतोय, त्यांचा काय संबंध आहे मुंबईशी
  • कमळाबाई आणि मुंबईचा संबंध काय
  • मुंबई तुम्हाला गिळायची आहे
  • मुंबई ही जमीन नाही, ही आमची मातृभूमी आहे.
  • आम्ही तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही
  • मुलं पळवणारी टोळी ऐकलीय, पण बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्र पहिल्यांदा पाहतोय
  • मुंबई तोडण्यासाठी गिधाडे घिरट्या घलत आहेत, तुम्ही त्यांना मुंबईचे लचके तोडू द्याल का
  • आपण त्यांना सत्तेचे दूध पाजले आता त्यांची गटारे उघडली आहेत.
  • दसरा मेळावा पंरपंरेप्रमाणे शिवतीर्थावरच होणार
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर स्वागत
  • छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसोहब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन
  • त्यावेळी भाजपच्या मांडीला मांडी लावत काम करू शकत नाही, असे ते म्हणत होते, नंतर काय बदल झाले.
  • कोरोना काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला वाचवले.
  • भाजपने जागावाटप आणि 50 टक्के सत्तेचे वाटप याबाबत दिलेला शब्द फिरवला.
  • आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, या भावनेतून आपण एकत्र आलो आहोत.
  • शिवसेना संपली असे म्हणणाऱ्यांनी या मेळाव्याला यावे, शिवसेना कशी ठामपणे उभी आहे, हे त्यांना समजेल.
  • खासदार अरविंद सावंत यांच्या संबोधनाला सुरुवात
  • 40 गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसणे जनतेच्या जिव्हारी लागले आहे.
  • शिवसेना पक्षप्रमुख यांच्याबाबत सर्व जनतेमध्ये आदर निर्माण झाला आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आमच्याकडे आहे.त्याचा प्रत्यय गेल्या अडीच वर्षात जनतेने घेतला आहे.
  • मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस आमचा आहे, ही भावना शिवसेनेने कायम ठेवली आहे.
  • त्यावेळी मराठी माणूस शांत घरी बसला असता तर काय झाले असते.
  • मुंबई दंगलीत शिवसेनेनेच मुंबी वाचवली.
  • पूर्वी रक्तपेढी नसताना गरज लागेल तिथे शिवसैनिकांनी आपले रक्त दिले आहे.
  • काही वर्षापूर्वी गणेश विसर्जन कसे होत होते, यंदा कसे झाले, याचा विचार करावा.
  • त्यामुळे महापालिकेवर आपला शिवसेनाचा भगवा फडवण्याच्या निर्धाराने आपण एकत्र आलो आहोत.
  • आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता मागतो, ते त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्ता मागत आहेत.
  • एका पक्षाचे केंद्रीयमंत्री मुंबईत आले, आम्हाला मुंबईची सत्ता हवी, हे आमचे जुने स्वप्न असल्याचे ते म्हणाले.
  • विकासासाठी शिवसेना सत्ता मागते, जनतेची सेवा करण्यासाठीच आम्हाला सत्ता हवी आहे.
  • मुंबईची सत्ता गेल्या 20 वर्षांपसून जनतेने शिनसेनेकडे विश्वासाने दिली आहे.
  • त्यांचे विचार आपल्याला गटप्रमुख म्हणून जनतेपर्यंत पोहचवायचे आहे.
  • आपण आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांचे दूत आहोत.
  • या सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करतील, ते आपण आपल्या भागात न्यायचे आहे.
  • ही जाहीर सभा नसून गटप्रमुखांचा मेळावा आहे.
  • आमदार भास्कर जाधव यांच्या संबोधनाला सुरुवात

गोरेगाव येथील नेस्को संकुलात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांना मार्गदर्शन करत आहेत. या मेळाव्याबाबत उत्सुकता आहे. या मेळाव्याला सुरुवात झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याबाबतची उत्सुकता आहे.