LIVE: 2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार- उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

  • वज्रमूठ ठेवा, हा भगवा दिल्लीवर ही फडकवू
  • सरकार केवळ जाहिरात करणार, आपण फक्त गप्प बसायचं का?
  • कर्ज माफी किती जणांना ? एक ही नाही ? मग कर्ज माफी कोणाची झाली, पैसा कोठे गेला
  • मी जनतेची बाजू मांडतोय
  • तुम्ही आमच्या आणि मतदारातील दुवा आहेत
  • माझा गटप्रमुख म्हत्वाचा आहे, तोच पक्षाला तळागळात घेउन जाणार आहेत, पक्षाला सत्ता मिळवून देणार आहे
  • 2019 ला मत द्या यांना म्हणजे हे 2022 ला घरे देणार , थापडे आहेत सगळे
  • जा या सरकारच्या खोट्या जाहिराती घेऊन दाखवा त्यांना, जाहिरातीत दाखवलेले काही पदरात पडले का?
  • शिवसैनिकानो घरा घरात जा, दादाशी बोला, ताईशी बोला
  • मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा कारण मला  राज्य उभारायचं आहे, तुम्हाला काही तरी द्यायचे आहे
  • आमच्यावर टीका करणारे काँग्रेसवाले सगळीकडे माथा टेकवत आहेत
  • आमच्यावर काँग्रेसवाले टीका करतात की निवडणूक आली की राम आठवतो, पण त्यांना कधी राम आठवला
  • 2019 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच
  • गावागावत शाखा पाहिजे
  • गोपीनाथरावांसाठी एक एक मतदार संघ आम्ही सोडला, पण आता मला बीड मध्ये सगळ्या जागांवर भगव्याचे राज्य पाहिजे
  •  मी खोटं बोलत नसतो, माझ्या वडिलांनी मला खरे बोलायचे शिकवले
  • हिंदूंचा भ्रम निसार झाला आहे
  • कर्नाटक सरकार ने निकष बाजूला सारून दुष्काळ उपाय योजना सुरू केल्या आमचे सरकार फक्त कागदे काळे करत आहेत
  • न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, पण राम मंदिरसाठी कायदा केला तर निर्णयाचा प्रश्नच नाही
  • राम मंदिरचं काय झालं? राम मंदिर अनेक पिढ्या गेल्या
  • पदरात काय पडले काहीच नाही
  • पण त्यानंतर आपल्याला काय पहायला मिळालं? नोटबंदी, जीएसटी, दरवाढ
  • आपण ही सरकार च्या सोबत होतो, हिंदूतवासाठी
  • हे सरकार मजबूत म्हणून सत्तेवर आले हा चमत्कार
  • 2014 मध्ये आपण हिंदू म्हणून एकत्र येत सत्ता आणली
  • हिंदुत्व मानणारे सरकार दिल्लीवर बसणार हे शिवसेना प्रमुखणी प्रमोद महाजनांना सांगितले होते, आज ते शक्य झाले
  • हिंदू आणि हिंदूत्व बोलण्याची कुणाची ताकद नव्हती तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है, असा आवाज दिला
  • शिवाजी महाराज्यांचे आशीर्वाद मागायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांवर अत्याचार करायचे असं सुरू आहे
  •  शिवसेना प्रमुखाचा दंडक होता लोक आपल्याकडे नाही सरकार लोकांपर्यंत गेले पाहिजे याला म्हणतात लोकशाही , शिवशाही
  • इथे राज्यात गंभीर परिस्थिती आहे, तळे आटले आहे
  • राज्यात केंद्रात तुमची सत्ता मग प्रश्न कुठे आहे
  • संपूर्ण देशातील शेतकरी दिल्लीत गेले, तिकडे मंत्री भेटले नाहीत, पाण्याचे फवारे मारले
  • तुम्हाला चावी मारायला नाही तर चार्ज करायला आलो
  • हा जल्लोश मैदानात उतरल्यावर दिसायला पाहिजे
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
  • खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाषण पूर्ण
  • शेतकऱ्यांचे सरकार आणायचे आहे- खैरे
  • महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेची सत्ता आणायची आहे-खैरे
  • शिवसेनेवर जनतेचा विश्वास आहे,विकास फक्त शिवसेनाच करू शकते- चंद्रकांत खैरे
  • बंडू जाधव, गोविंद घोळवे, मनीषा ताई कायनदे, सुनील धांडे, चंद्रकांत नवले, कुंडलिक खांडे, सचिन मुलूक, अनिल जगताप, अर्जुन खोतकर व्यासपीठावर उपस्थित
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे, सुधीर मोरे, मिलिंद नार्वेकर व्यासपीठावर उपस्थित
  • बीडमधील शिवसेनेच्या मेळाव्यासाठी प्रचंड गर्दी
  • उद्धव ठाकरे यांचा बीडवासीयांकडून सत्कार
  • उद्धव ठाकरे मेळाव्याच्या व्यासपीठावर दाखल

 

भेट दिलेला आसूड हातात घेत मी शेतकऱ्यांसोबत आहे, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, घाबरू नका, दुष्काळ किती ही भयावह असला तरी आपण त्याचा सामना करू- उद्धव ठाकरे

  • या भागातील शेतकरी  सखाराम मस्के, सुनील घोलप,अप्पराव कदम, सर्जेराव घोलप यांच्याशी संवाद साधला
  • दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे ही अस्वस्थ झाले
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीड येताच थेट दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी तळेगाव कडे रवाना
  • सरकारला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात दिला आसूड
  • शेतकऱ्यांशी साधला संवाद
  • उद्धव ठाकरे दुष्काळ पाहणी साठी थेट  बांधावर
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीडमध्ये पोहोचले