
बिहारमध्ये लोक जनशक्ति पक्ष जनता दल युनाटेडच्या विरोधात निवडणूक लढणार आहे. असे असले तरी लोजपने एनडीतून बाहेर पडण्यास नकार दिला आहे, तसेच पंतप्रधान मोदींचे हात मजबूत करण्याचा निर्धार केला आहे.
दिल्ली: लोक जनशक्ति पार्टी (LJP) के प्रमुख चिराग पासवान ने पार्टी की केंद्रीय संसदीय बोर्ड की बैठक के बाद विक्ट्री साइन दिखाया।
आगामी बिहार विधानसभा चुनाव में लोक जनशक्ति पार्टी (LJP) जनता दल (यूनाइटेड) के साथ गठबंधन में नहीं लड़ेगी। pic.twitter.com/TbLmRDnTFL
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2020
काही दिवसांपूर्वी बिहार निवडणूकीची घोषणा झाली होती. तरी एनडीएतील जागा वाटपाचा प्रश्न सुटला नव्हता. त्यात लोजपचे नेते रामविलास पासवान हे रुग्णालयात दाखल असल्याने चिराग पासवान यांच्याकडे पक्षाची मदार होती. सुरूवातीपासूनच चिराग यांनी जदयुविरोधात आव्हान उभे केले होते. तसेच जास्त जागांची मागणीही केली होती. आपल्याला हव्या तेवढ्या जागा न मिळाल्यास लोजपने स्वबळाचा नारा दिला होता.
राष्ट्रीय स्तर व लोकसभा चुनाव में भाजपा, लोक जनशक्ति पार्टी का मजबूत गठबंधन है। राजकीय स्तर पर व विधानसभा चुनाव में गठबंधन में मौजूद जनता दल (यूनाइटेड) से वैचारिक मतभेदों के कारण बिहार में लोक जनशक्ति पार्टी ने गठबंधन से अलग चुनाव लड़ने का फैसला किया है : लोक जनशक्ति पार्टी pic.twitter.com/0M4MI21qhg
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2020
अखेर लोजपने जदयुशी फारकत घेतली आहे, असे असले लोजपने एनडीए सोडलेली नाही. राष्ट्रीय स्तरावर लोजप आणि भाजपची युती भक्कम असल्याचे लोजपने म्हटले आहे. तसेच बिहार निवडणुकीत जदयुविरोधात लोजप उमेदवार उभे करणार आहेत. जर निवडणुकीत यश आले तर राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचे लोजपने जाहीर केले आहे.
चुनाव परिणामों के उपरांत लोक जनशक्ति पार्टी के तमाम जीते हुए विधायक प्रधानमंत्री मोदी जी के विकास मार्ग के साथ रहकर भाजपा-लोजपा सरकार बनाएंगे : लोक जनशक्ति पार्टी https://t.co/d9E1CeIzAk
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2020




























































