एलएलबी सत्र 5 परीक्षेचा निकाल जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या अंतिम वर्षाच्या हिवाळी सत्राच्या आंतर विद्याशाखेच्या तृतीय वर्ष एलएलबी सत्र 5 (60ः40) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

एलएलबी सत्र 5 च्या परीक्षेमध्ये एकूण 6001 विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 6826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6781 एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर 45 विद्यार्थी अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत 596 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. एलएलबी सत्र 5 चा निकाल 90.91 टक्के लागला आहे. विद्यापीठाने आजपर्यंत 2023-24 च्या हिवाळी सत्राचे 159 निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.