एल.एल.एम. सीईटी परीक्षेच्या प्रवेश अर्जास अंतिम मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या एल.एल.एम. कॉमन एंट्रान्स टेस्ट (एलएल.एम. सीईटी) परीक्षेच्या प्रवेश अर्जास 19 मे रात्री 11 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केले नाहीत किवा ज्यांचे अर्ज अपूर्ण राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर ‘Online LL.M. CET Exam – 2026-27’ येथे क्लिक करून अर्ज सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. ही अंतिम मुदतवाढ असून यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. एल.एल.एम. सीईटी प्रवेश प्रक्रियेसाठी एल.एल.बी. पदवी उत्तीर्ण झालेले तसेच 3 किंवा 5 वर्षांच्या एल.एल.बी. अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.