
लोकलने प्रवास करणाऱ्य़ा प्रवशांसाठी खुष खबर आहे. मासिक पास सोबत प्रवाशांना तिकीटही मिळणार आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना फक्त मासिक पास दिला जात होता. आता प्रवाशांना तिकीटही मिळणार आहे.
कोरोनामुळे राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच फक्त मासिक पास देण्याची परवानगी दिली होती. लस घेतल्यानंतर प्रवाशांना मासिक पास मिळत होता. परंतु तिकीट मिळत नसल्याने अनेक प्रवाशांना त्रास होत होता.
तिकीट न मिळाल्याने अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करत होते, त्यामुळे कोरोनाचा धोका तर वाढत होता तसेच रेल्वेचा महसूलही बुडत होता. म्हणून आपत्ती निवार विभागाने रेल्वेला पत्र लिहून लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिकीट देण्याची परवानगी दिली आहे. ज्या नागरिकांनी लसींचे दोन डोस घेऊन 15 दिवस झाले आहेत त्यांनाच तिकीट दिले जाईल. तसेच या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.






























































