निरागस कथा दाखवणार ‘लोकल व्हाया दादर’

22

आगामी ‘लोकल व्हाया दादर’ या चित्रपटाचा टीझर पोस्टर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. हिंदीतील अभिनेता वरूण धवन याने हा टीझर पोस्टर आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केला असून त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन रोकडे आणि संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या. करूणावी क्रिएटरची निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये एक निरागस प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. कथा-पटकथा नितीन रोकडे यांची असून त्यांनी यापूर्वी ‘तालीम’ मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटाचे संवाद सायली केदार यांचे असून फारूख खान छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडणार आहेत. कलादिग्दर्शन नितीश रॉय करणार असून प्रॉडक्शनची जबाबदारी सदाशिव चव्हाण सांभाळणार आहेत. अतिक अलाहाबादी यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून या गीतांना संगीतकार विक्रम मॉन्ट्रोज संगीतबद्ध करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या