
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या घरी गेले ही चांगली गोष्ट आहे, पण केवळ घरी जाण्याचा दिखावा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या, त्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या, राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करतात हे अत्यंत भयंकर असून त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पुटुंबाकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
डेटा सेंटरमुळे पिण्याचे पाणीही मिळणार नाही
उजनीमध्ये येणाऱया एआय डेटा सेंटर प्रकल्पावरूनही रोहित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी, विजेचा वापर केला होता, परंतु त्या तुलनेत रोजगार निर्मिती होत नाही. गुजरातमध्ये सहा लाख कोटींची गुंतवणूक होते आणि तिथे मोठय़ा प्रमाणावर रोजगारही मिळतो. तशी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सरकारने महाराष्ट्राला दिली पाहिजेत, अशी मागणी पवार यांनी केली.



























































