
लॉकडाउन कालावधीत जेष्ठ नागरिकांसह आजारी, वृद्ध, बेघर नागरिकांना वेळेत मदत करणाऱ्या नागरिकांचा जयहिंद संघटनेच्यावतीने सन्माानित करण्यात आले. खडक परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते अनंता नारायण दळवी यांना संघटनेचे अध्यक्ष सुनिल नवले यांच्यावतीने जयहिंद योध्दा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये मंडळाच्यावतीने नागरिकांना मास्कसह अन्नदान करण्यात आले. त्यावेळी मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांकडून स्वयंस्फुर्तीने गरजूंना मदत करण्यात आली. रुग्णांसह जेष्ठ नागरीकांना औषधे उपलब्ध करुन देण्यात आली. त्याशिवाय नागरिकांना चहा- नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. ग्राहक पेठच्या माध्यमातून सुर्यकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली धान्यकिटचे वाटप करण्यात आले. त्याशिवाय खडक पोलीस ठाण्यातंर्गत पोलिस मित्र म्हणून काम करणाNयांचा सन्मान करण्यात आला.



























































