लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ

407

गेल्या तीन महिन्यांत नाशिक जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूक, सोशल मिडिया अकाऊंट हॅक करणे, कोरोनाबाबत अफवा पसरविल्याच्या घटना वाढल्या आहेत. नाशिक शहर व ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन गंडा घातल्याच्या एवूâण १२७ तक्रारी आल्या असून, अकाऊंट हॅकच्या २७ गुन्ह्यांत ३७ जणांना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या ग्रामीण भागात ५७, तर शहर सायबर पोलीस ठाण्यात ७० हून अधिक तक्रारी दाखल आहेत. पोलिसांनी शोध लावून यातील पाच लाखांपर्यंतची रक्कम संबंधितांना परत मिळवून दिली आहे. अद्यापही ८० टक्के गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. लष्करी अधिकारी असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार अलीकडे घडले. विविध अॅपद्वारे पैसे हडप केल्याच्या घटना वाढल्या आहेत.

फसव्या कॅशबॅक ऑफर्सचा फटका
सध्या कॅशबॅक ऑफर्सच्या नावाखाली अनेकांची लूट सुरू आहे. सुमारे ४५०० इतकी कॅशबॅक मिळत असल्याचे भासवून फोनवर आलेला ओटीपी विचारून बचत खात्यातून रक्कम काढल्याचे प्रकार घडले. ग्रामीण भागात इंटरनेट स्पीड वाढविण्याच्या बहाण्याने रिमोट अॅक्सस अॅप्लकेशन डाऊनलोडचे अॅप इन्स्टॉल करायला लावून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार घडले. यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

अशी घ्या काळजी
ह व्हॉट्सअॅपवरील विविध डेटा पॅकच्या िंलक उघडू नका.
ह गुगल प्ले स्टोअरवरील गो फॉर ट्रस्टेड या पर्यायाद्वारे सुचविलेले अॅप इन्स्टॉल करा.
ह स्क्रीन शेअर करताना वैयक्तिक माहितीचे टॅब बंद करून ठेवा.
ह स्ट्राँग पासवर्ड व अँटिव्हायरसचा वापर करा.
ह अधिकृत संकेतस्थळावरूनच कोरोनाविषयीची माहिती मिळवा, अफवांवर विश्वास ठेवू नका.
ह वैयक्तिक तपशील, बँक कार्ड डिटेल्स, ओटीपी कुणालाही देऊ नका.
ह घरातील वृद्धांनाही ऑनलाइन र्आिथक व्यवहारांबाबत सजग करा.

आपली प्रतिक्रिया द्या