
केंद्र सरकारने अनलॉक 2.0 ची नियमावली जारी करत 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तसेच उद्या मंगळवारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणात आहेत.
Govt of India announces guidelines for ‘Unlock 2’ to be in force till July 31st pic.twitter.com/6TiviQtmts
— ANI (@ANI) June 29, 2020
केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्य नियमावलीनुसार सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी जारी आहे. त्याता राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश आहे. देशभरात शाळा कॉलेजस बंद राहतील. रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद राहतील. चित्रपटगृह, स्विमिंग पूल बंद राहतील. रात्री 9 ते सकाळी 5 कर्फ्यू असणार आहे. देशांतर्गत विमानसेवा आणि पॅसेंजर रेल्वे सेवा आधीच सुरू करण्यात आली आहे. पुढील काळात या सेवा अजून वाढवल्या जातील. तर मंगळवारी 4 वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
Prime Minister @narendramodi will address the nation at 4 PM tomorrow.
— PMO India (@PMOIndia) June 29, 2020
लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क घालूनच बाहेर पडावे, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच शक्य असल्याने कर्मचाऱ्य़ांनी घरूनच काम करावे असेही नियमावलीत म्हटले आहे.




























































