लॉकडाऊनमधलं कला‘वैभव’

336

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देवरुखातील कासारकोळवण या आपल्या गावी आलेला अभिनेता वैभव मांगले लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीतच अडकला. या काळात त्याने चित्रकला आणि रंगकाम या दोन कला जोपासल्या. लाकडाच्या तुकड्यांवर त्याने आकर्षक चित्रे काढली. रंगरंगोटी करून वॉलपीस वाटावीत अशा प्रकारची चित्रे त्याने रेखाटली आहेत.

फळकुटणं म्हणून फेकून दिलेल्या लाकडांना साज चढवण्याचे काम वैभव मांगले यांच्या चित्रकलेने केले आहे. लाकडावर चित्रे रेखाटण्याबरोबरच आकर्षक रंग वापरून ती अधिक प्रदर्शनीय कसे होईल याकडे त्याने अधिक लक्ष दिले आहे. गावच्या घरी असताना दिवसभर काय करावे हा विचार न करता नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करत असताना दुर्लक्षित राहिलेली कला त्याने जोपासली.

आपली प्रतिक्रिया द्या