वाईटातून चांगलं घडतंय…

743

>> आशा शेलार, अभिनेत्री

गेल्या चार-पाच महिन्यांत जगाला हादरा देणाऱया गोष्टी घडल्या आहेत. पण या वाईटातून चांगलं घडलंय. या काळात अनेकांना वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागलं. अनेकांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. त्यांच्या तुलनेत सुदैवाने आपल्या काटय़ाला तितका त्रास आला नाही. सगळ्या गोष्टी मिळत आहेत. इतरांपेक्षा आपली स्थिती बरी आहे, असं म्हणून मी आभारच मानते.

केळच मिळत नाही ही एक कुरबूर सगळ्यांची नेहमीचीच असते. मुलांची आणि पालकांची तर यावरून एकमेकांबद्दल कायमच तक्रार असते. पण आता या तक्रारीला वावच नव्हता. दोघांना एकमेकांसोबत भरपूर वेळ घालवता आला. घरातील प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात आपलेपणा वाटू लागलाय. माझ्यापुरतं सांगायचं तर सुरुवातीला मदतीला कुणी नाही याचा जरा त्रास झाला. पण एकटीनं सगळी कामे करण्यास मन सरावलं. मला त्याची खूप गोडी वाटू लागली.

मी अभिवाचनाचे कार्यक्रम तसे नेहमी करते. लॉकडाऊनच्या काळातही आशीष जोशी यांनी ‘इक्वेशन’ नावाची अभिवाचन सिरीज केली होती. त्याचा पहिला भाग मी केला. त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. काही उत्कृष्ट सिनेमा वेळेअभावी बघता आले नक्हते. ते मी घरात अगदी मोठय़ा क्रीनवर बघितले. त्यात वेळ छान गेला. मला मोबाईलवर टीव्ही बघणे किंवा सर्फिंग करणं अजिबात आवडत नाही. आता तर गेल्या 15-20 दिवसांपासून मालिकेचं शूटिंग सुरू झालंय. पूर्ण खबरदारी घेऊन शूटिंग करतोय. सेटवर आर्टिस्टची गर्दी नाही. एका वेळी जास्तीत जास्त पाच आर्टिस्ट, ‘क्लोज प्रॉक्सिमिटी’वाले सीन कमी… अशी बरीच काळजी घेतली जात आहे. निश्चितच आधीपेक्षा सेटवरच्या वातावरणात फरक पडलाय. आपल्या आरोग्याची काळजी घेतानाच आपल्यामुळे दुसऱया कुणाला त्रास होणार नाही, ही खबरदारी घेणं ही सामाजिक बांधिलकी आहे. त्यादृष्टीने सर्क नियमांचं पालन केलं जातंय.

शेवटी एवढंच सांगेन की, आपल्याला अमूक मिळालं नाही, त्यापेक्षा काय मिळालं हे महत्त्काचं आहे. या सगळ्यात मी चांगला श्वास घेऊ शकले हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला मिळालेल्या श्वासाची किंमत ठेवून यापुढे अत्यंत जबाबदारीने वागलं पाहिजं. आपण अनेक संकटं झेलली आहेत. याही परिस्थितीला तोंड देऊन बाहेर पडू, याबाबत मी आशावादी आहे.

आधी सुरुवात स्वत:पासून करा

माझा मुलगा निसर्गतज्ञ आहे. त्याचे मरीन कॉन्झर्केशन या विषयावर स्पेशलायझेशन आहे. त्यामुळे पर्यावरण, निसर्गावरून आमच्यात नेहमी गप्पा होतात. तो मला म्हणाला, खरंतर आधीच खूप उशीर झालाय. माणूस अशाच पद्धतीने वागत राहिला तर ‘तो’ दिवस लांब नाही. निसर्ग वाचवण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करावेत. त्याची सुरुवात आधी स्कतŠपासून करावी.

आपली प्रतिक्रिया द्या