हे दिवसही सरतील…

579

>>  सायली संजीक, अभिनेत्री

कामाच्या सततच्या धाकपळीत मला एका ब्रेकची नितांत गरज होती. शूटिंग संपल्याकर कुठेतरी जाऊन दहा दिवस आराम करण्याचे माझे प्लॅनिंग होते. हवाहवासा असणारा ब्रेक मला लॉकडाऊनमुळे मिळाला. त्यामुळे सुट्टीचे फारसे दडपण मला आले नाही.

ज्या गोष्टी बिझी शेडय़ुलमुळे करायच्या राहून गेल्या त्या गोष्टी करण्याकडे मी या सुट्टीत भर दिला. वेळ सकारात्मक घालवण्यासाठी आवडेल त्या गोष्टींमध्ये बिझी राहिले. दररोज दोन तास न चुकता अष्टांग योगा केला. दोन वर्षांच्या गॅपनंतर हार्मेनियम आणि पेटीवर सराव केला. एरव्ही स्वयंपाक करण्याची संधी मिळत नाही. या काळात मी किचनमध्ये रमले. रोज नवनवीन पदार्थ बनवले. पुस्तक वाचनाची मला फारशी आवड नसली तरी या दरम्यान काही पुस्तकं आवर्जून वाचली. डुडल आर्ट करणे, लोकरीपासून घरासाठी वस्तू बनवणे अशा क्रिएटिव्ह गोष्टी केल्या.

कामानिमित्त मी मुंबईत एकटीच असते. माझे आई-बाबा नाशिकला असतात. माझ्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी ते लॉकडाऊनपूर्की मुंबईत आले आणि इथेच अडकले. या संकटादरम्यान त्यांची मिळालेली साथ माझ्यासाठी खूप मोलाची होती. ते सोबत असल्याने मला फारसे दडपण आले नाही. लॉकडाऊनदरम्यान न्यूज चॅनेलवर सतत कोरोनाच्या बातम्या येत होत्या. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचे दडपण घेऊन काही लोक या काळात निगेटिव्ह विचार करत होते; परंतु कोरोना हा व्हायरस आहे. कोणतीही गोष्ट फार काळ टिकत नाही. वेळ निघून जातो त्याप्रमाणे कोरोनाचे संकटही निघूनही जाईल, अशाप्रकारे मी त्यांची समजूत काढायचे.

कामाविषयीचा आदर वाढला!

हल्लीची पिढी कामाच्या बाबतीत खूप सिलेक्टिव्ह झाली आहे. हे काम नको, ते नको. आता थोडा आराम करूया असे काहींचे विचार असतात;. परंतु या दरम्यान सगळ्यांना कामाचे महत्त्व कळले. कामाविषयीचा आदर वाढला. जे मिळतंय ते काम आपण करत राहिले पाहिजे याची जाणीव अनेकांना झाली. मी या इंडस्ट्रीत आले तेव्हा सिनेमा, मालिका अशा कोणत्याही माध्यमात काम करत राहायचे हे मी ठरवले होते. आपण त्यावेळी घेतलेला निर्णय योग्यच होता याचे मला समाधान वाटतेय.

आपली प्रतिक्रिया द्या