मातृत्वाचा आनंद अन् कलेची साधना

496

>>  योगिनी चौक, अभिनेत्री

नुकतीच मी दोन जुळ्या मुलांची आई झालेय. मी विचार करत होते की, माझी बाळं सहा महिन्यांची झाल्यावर आपण बाहेर कामं घ्यायला सुरुवात करूया. पक्कं असं काही ठरलं नव्हतं; पण असा विचार डोक्यात सुरू होता. नेमवं लॉकडाऊन सुरू झालं आणि माझं बाहेर जाणं रद्द झालं. त्यामुळे मला आता अधिक काळ बाळांसोबत राहता आलं. मी त्यांची डेव्हलपमेंट बघत आहे. माझी बाळं आता अकरा महिन्यांची आहेत.

माझं ‘अनहद नाद-अनहर्ड साऊंड ऑफ युनिव्हर्स’ नाटक आहे. त्याचे संवाद खूप सुंदर आहेत. ‘अनहद नाद’ हे माणसाला माणूस म्हणून घडवण्याचे नाटक आहे. या नाटकाचे संवाद मी घरी म्हणते. माझ्या बाळासोबत त्या संवादाने खेळते. गोष्टी, गाणी जशी लेकरांना ऐकवली जातात तसं मी नाटकातील संवाद बाळांना ऐकवते. आता ती फारच लहान आहेत; पण ते जरा मोठे झाले की हे संवाद म्हणतील… अगदी मलाच शिकवतील. लॉकडाऊनच्या दिवसांत माझ्याशी बाळांशी संबंधित मी नवनवीन कविता, गाणी रचल्या. त्या मी फेसबुकवर पोस्ट केल्या. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आमचा ‘थिएटर ऑफ रेलेकन्स’चा अख्खा ग्रुप ऑनलाईन माध्यमातून दिवसभर संपर्कात असतो. याअंतर्गत संवाद, पुढच्या नाटकांची चर्चा असं सुरू असतं. मंजूल भारद्वाज सरांचे मार्गदर्शन मिळते. जणू आमचं थिएटर प्रॉम होमच सुरू आहे. आम्हा कलाकारांच्या वैचारिक वाढीचा हा काळ आहे, असं मला व्यक्तिश: वाटतं.

साधी राहणी काय असते याचा धडा या दिवसांनी दिला. अनावश्यक खर्चाला आळा बसलाय. आपण बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी पदार्थ बनवून खातोय. आज जेव्हा मी कॉर्डरोब उघडते तेव्हा धडाधड कपडे खाली पडतात. मी विचार करते, तीन कपडय़ांच्या जोडय़ांशिवाय काही लागत नाही की आपल्याला! अशा खूप चांगल्या सवयी या दिवसांनी शिकवल्या. या काळाने माणसाला माणूस म्हणून घडवलं. माणुसकीचं दर्शन झालं. एखाद्याच्या घरात कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला की त्याच्या घरातल्यांना मदत करायला आजूबाजूची माणसं धावतात. त्यांना काही हवंनको ते बघितलं जातं. आमच्या इथे दोन बिल्डिंग सोडून कोरोना संसर्गाच्या केसेस झाल्या. मला बाहेर जाऊ देत नव्हते. कारण बाळांना इनफेक्शन नको, पण माझ्या घरातल्या मंडळींनी अशा कुटुंबांना मदत केली.

या काळाकडे मी एक ‘रिप्रेशमेंट’ म्हणून बघते. धावपळीच्या आयुष्याला ब्रेक लागलाय. छोटय़ा ब्रेकनंतर रिस्टार्ट घ्यायचा आहे. त्यासाठी स्वत:ला सज्ज करायची ही उत्तम संधी आहे.

थिएटरचा अनुभव कमाल!

नाटकाला कलाकार जितवं ‘मिस’ करतात तितकं प्रेक्षकही करतात. या दिवसांत काही जणांनी वेगळ्या वाटा शोधल्या. ‘नेटक’सारखे प्रयोग होत आहेत. निश्चितच कौतुकास्पद आहे. पण शेवटी थिएटरचा अनुभव हा वेगळा असतो. तो जिवंत अनुभव कमाल असतो. कलाकार आणि प्रेक्षकांच्या आमनेसामने येण्याने तो साधला जातो. त्यासाठी संयम बाळगण्याशिवाय आपल्या हाती काही नाही. सध्यातरी प्रतिकार शक्ती वाढवणे, मानसिक स्कास्थ्य सांभाळणे याकडे लक्ष देऊया…

आपली प्रतिक्रिया द्या