Lockdown ला भाजप नेत्याकडून हरताळ, गावात केलं फिल्मचं शूटिंग

2011

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसेच देशातील जनतेने स्वतःहून हा कर्फ्यु पाळावा, असे आवाहन देखील केले आहे. मात्र असे असतानाच भाजपच्याच नेत्यांनी त्याला हरताळ फासल्याचे पाहायला मिळते आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरसचा प्रभाव नष्ट होण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत म्हणजेच 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांनी लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा प्रयोग करण्यास सांगितले आणि त्यासाठी ते सतत प्रेरित करत आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते याला केराची टोपली दाखवताना पाहायला मिळते. सुपौल येथील माजी खासदार आणि भाजपचे नेते विश्वमोहन कुमार यांनी लॉकडाऊन विरोधात आपल्या घरामध्ये एका फिल्मचं शूटिंग केले आहे. या शुटिंगच्या वेळी शेकडो लोक इथे काम करण्यासाठी जमले होते. तसेच गावातील अन्य व्यक्तीही या वेळी या ठिकाणी एकत्र जमले होते. विशेष म्हणजे माजी खासदार असलेले विश्वमोहन कुमार हे बिहारमध्ये मंत्री देखील राहिले होते.

सुपौलचे माजी खासदार यांच्या गावात आणि घरामध्ये शूटिंग सुरू होते. फिल्मचे शूटिंग रोखण्यासाठी एसपी मनोज यांनी कडक पावले उचलली. तसेच फिल्म प्रोड्युसर आणि विश्वमोहन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. विश्वमोहन यांच्यासह प्रोड्युसरवर देखील तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

खरे तर प्रकरण समोर आल्यानंतर एसडीओला याच्या संदर्भात माहिती देण्यात आली. या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देखील बिडिओला देण्यात आली होती. मात्र त्यांनी शूटिंग झाली नसल्याची खोटी माहिती दिली.

अखेर काही स्थानिक लोकांनी पुढे येऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर एसपी रतोली गावात पोहोचले. स्वतःहून चौकशी केली. यावेळेस गावकर्‍यांनी या ठिकाणी शूटिंग झाल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणी अधिकारी कयूम अन्सारी यांनी सांगितले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. हिंदुस्थानात कोरोनाव्हायरसचा प्रभाव वाढताना पाहायला मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या