संचारबंदीचा आदेश धुडकावून बाजार भरला, अंबड तालुक्यातील अंतरवाली येथील प्रकार

केंद्र सरकारने देशात 21 दिवस संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखवत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरविण्यात आला. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना बाबत कुणीही गांभीर्याने घेत नसल्याची स्थिती आहे.

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी बाजारात भाजीपाल्याची दुकाने थाटली होती. तिथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी झुंबड केली होती. बहुतांश नागरिकांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधले नव्हते.नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी प्रत्येक दुकानासमोर कोणतीही काळजी न घेता गर्दी केली होती. गावात एका वेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ नये, अशी सूचनाही पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.या सूचनांचे कुठलेही प्रकारे पालन नागरिकांकडून केले जात नाही. त्यामुळे लॉक डाऊन आणि संचारबंदीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची स्थिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या