नवी मुंबईत कोरोनाचे आणखी दोन रुग्ण; रुग्णांची संख्या दहावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई शहरात कोरोनाचे आणखी दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता दहा झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

वाशी येथे कोरोनाचा आज एक रुग्ण आढळून आला. हा रुग्ण वाशीतील मशिदीमध्ये फिलिपीन्स नागरिकाच्या संपर्कात आला होता. या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या 52 जणांना होम क्वॉरंटईन करण्यात आलेले आहे. त्यापैकी आणखी एक जणामध्ये आज कोरोनाचे लक्षण आढळून आले. दुसरा रुग्ण नेरुळ येथे आढळून आला. हा रुग्ण मुंबई मध्ये एका कोरोनाबधीताच्या संपर्कात आला होता. त्याचाही अहवाल आज कोरोना बाधित आहे, असा आला. या दोघांनाही मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.