लॉकडाऊनमधील ‘75 दिवस’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रकांत पंडित

मार्च महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रासह हिंदुस्थानात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याआधी एका लग्नासाठी मुंबईहून चिपळूण गाठले होते. चार दिवस तेथेच राहायचा विचारही मनामध्ये सुरू होता. पण लॉकडाऊनमुळे तेथे चक्क 75 दिवस रहावे लागले. मात्र मुंबईपासून दूर असूनही तेथे कसलेच टेन्शन नव्हते. हव्या त्या सुविधा नसल्या तरी सर्व काही सुरळीत सुरू होते. एरव्ही इतके दिवस गावी राहण्याचा योग केव्हाही आला नव्हता. त्यामुळे हे 75 दिवस लक्षात राहण्यासारखेच ठरले.

माझ्यासह पत्नी, भाऊ व त्याची पत्नी असे सर्व गावी गेलो होतो. आमच्या घराजवळ आजूबाजूला मोकळी जागा असल्यामुळे कसलाही त्रास नव्हता. शिकाय मुंबईत असलेल्या कोरोना परिस्थितीपेक्षा तिथली परिस्थिती वेगळी होती. दिवसभर काही ना काही काम करायचो. या कालावधीत झाडांना पाणे देणे, फांद्या छाटणे, मातीची कामे तसेच घरातील रिपेअरची कामे करून टाकली.

गावामध्ये मुंबईत असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे जेवणामध्ये विविधता करायला मिळाली नाही. डाळ, भात, भाजी, चपाती हे साधे जेवण असायचे. पण त्यातही मजा यायची. मात्र आंबे व फणस या फळांवर चांगलाच ताक मारला. आमरसही मनसोक्त प्यायलो. वांग्याचे भरीत व मटण घुना हे आकडीचे पदार्थही आवर्जून खाल्ले.

75 दिवसांनंतर गावाहून थेट मुंबई गाठले. मुंबईत आठवडाभर राहिलो आणि पुन्हा एकदा कामाला लागलो. गेले सात दिवस इंदोरमध्ये आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडून संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता या मोसमात मी मध्य प्रदेशसाठी काम करीन. तेथील क्रिकेटचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करीन.

गावी असतानाही मोबाईलवर मीटिंग होत होत्या. तेथील खेळाडूंना मागील वर्षी कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामधून ते कशाप्रकारे बाहेर येऊ शकतात. याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. फिटनेसवर लक्ष द्यायला सांगितले. एवढेच नव्हे तर अंधेरीतील माझ्या अॅकॅडमीतील युवा खेळाडूंनाही घरी बसून क्रिकेटसोबत कसे काय बांधून राहू शकता याचेही मार्गदर्शन केले. त्यानंतर या अॅकॅडमीतील काही मुलांनी टेरेसवर सराव केला. काहींनी आरशात बघून क्रिकेटचे बारकावे आत्मसात केले.

प्रशिक्षक ते संचालक प्रवास

मुंबई, विदर्भाला यश मिळवून दिल्यानंतर मध्यप्रदेशकडे कूच केलीय. याकेळी मुख्य प्रशिक्षक ते संचालक असा प्रकास सुखावणारा ठरलाय. संचालकपदी नियुक्त झाल्यामुळे मला आता येथे आल्यापासून तेथील पायाभूत सुविधांपासून मुख्य संघापर्यंत सर्कच स्तरावर लक्ष द्यावे लागत आहे. मध्य प्रदेशचा क्रिकेटचा स्तर उंचाकण्यासाठी जीवाचे रान करीन.

नियम पाळावेच लागतील

कोरोनाचे संकट केव्हा जाईल माहीत नाही. पण तोपर्यंत तरी सरकारकडून करण्यात आलेले सर्क नियम सर्कसामान्यांपासून खेळाडूंना पाळावेच लागतील. कारण खेळाडू कितीही मोठा असला तरी त्यालाही भीती वाटते हे विसरता कामा नये.