लॉकडाऊन वाढणार काय? गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

816

लॉकडाऊन-4 रविवारी संपणार असून, या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. सोमवारपासून केंद्र सरकार काय निर्णय घेणार? लॉकडाऊन वाढणार काय ? लॉकडाऊनचा पाचवा टप्पा कसा असेल? याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

लॉकडाऊन 5.0 शक्यता

प्रत्येक लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. मात्र, लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्यापूर्वी दोन दिवस आधी गृहमंत्री अमित शहा यांनी फोनद्वारे विविध राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली.

हिंदुस्थानातील लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तो पुढे वाढवायचा अथवा नाही या संदर्भात शुक्रवारी दिवसभरात घडलेल्या घडामोडीचा Shreerang Khare यांनी घेेतलेला आढावा

Posted by Saamanaonline on Friday, May 29, 2020

राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढणारी ठिकाणी आणि 1 जूनपासून कोणती क्षेत्रे सुरू करता येतील. कोणते नियम शिथील करावेत याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊन देशभरात, संपूर्म राज्यात किंवा कंटेनमेंट झोन परिसरात वाढवावा याबाबत चर्चा झाली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊनचा कालावधी 10-15 दिवसांनी वाढवावा अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

पंतप्रधान मोदी- शहा यांच्यात चर्चा
मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर गृहमंत्री शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. 321 मे नंतर लॉकडाऊनबाबत काय ? याचा निर्णय 30 मे रोजी म्हणजेच शनिवारी होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, बिहारची स्थिती 15 दिवसांनंतर समजेल
श्रमिक विशेष ट्रेन, बसेसद्वारे आतापर्यंत 91 लाख मजूर आपापल्या घरी परतले आहेत. त्यातील 80 टक्के मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहेत. आणखी मजूर तेथे परतत आहे. या दोन राज्यांत कोरोनाचा संसर्ग किती आहे हे समजण्यासाठी 10-15 दिवस जावे लागतील असे सरकारी सूत्रांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या