सोलापूरमध्ये उद्यापासून लॉकडाऊन; औषधांसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

641

कोरोनाचा वाढता फैलावामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील सात पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमवेत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बैठका झाल्या. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकड़ाऊन आणि संचारबंदीची काचेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोलापूरमध्ये 16 ते 26 जुलैदरम्यान शहरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. हॉस्पिटल, मेडिकल आदी काही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मार्च,एप्रिल व मे या अडीच महिन्यात लॉकडाऊनच्या काळात शहरामध्ये संचारबंदी होती. संचारबंदी उठवल्यानंतर हळूहळू बाजारपेठा, भाजीपाला व अन्य दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाऊ लागली आहे.कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि वाढणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाला सोलापुरात कडक संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सात पोलीस ठाण्यांना भेट देऊन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या काळात पोलीस कर्मचाऱ्यांकडून सतत पेट्रोलिंग केली जाणार आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास गय केली जाणार नाही – पोलीस आयुक्त
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांच्या संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. आदेशाचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. उल्लंघन करणारी व्यक्ती कोणीही असो,त्याची गय केली जाणार नाही. हॉस्पिटल, मेडिकल, वृत्तपत्र आणि वर्तमानपत्रात काम करणारे कर्मचारी आदी काही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या