लॉकडाऊन काळातही गुगळे उद्योगसमूह कामगारांना वेतन देणार, मार्च महिन्याचे वेतन घरपोच केले

640

लॉकडाऊनमुळे राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळ्या कंपन्या, दुकाने बंद आहेत. असं असतानाही जामखेडमधल्या  एच.यू.गुगळे उद्योग समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनात कोणताही खंड पडणार नाही आणि कपातही केली जाणार नाही असं आश्वासन दिलं आहे. या कंपनीने मार्च महिन्याचा कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या घरी पोहचवला. या उद्योगसमूहात जवळपास 300 जण कामाला आहेत. या सगळ्यांना कायद्याचे उल्लंघन न करता आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळत पगार घरपोच करण्यात आला. वेतन मिळाल्यामुळे कर्मचारी सुखावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या