
लॉकडाऊनमध्ये नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्यक्षात नाटय़गृहात जाऊन नाटक कधी बघायला मिळणार यावर प्रश्चचिन्ह आहेत. अशावेळी नाटकवेड्या कलाकारांनी नुसतं हातावर हात धरून बसण्यापेक्षा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत लाइव्ह नाटक पोहोचवयाचं ठरवलं आहे. हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिले वाहिले ‘नेटक’ म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक ‘मोगरा’चा प्रयोग 12 जुलै रोजी होणार आहे. तोही आवडत्या नाटय़गृहात, अर्थात आपल्या दिवाणखान्यात!
काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांमध्ये ’शुभारंभाचा नाटय़प्रयोग तुमच्या आवडत्या नाटय़गृहात 12 जुलै रोजी’ असा संदेश फिरला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मराठी नाटय़रसिकांमध्ये जोरदार चर्चा झाली. नाटक सुरू होणार ही गोष्ट सुखावणारी असली तरी या पोस्टर क कि पने अनेक प्रश्नही रसिकांच्या मनात उभे राहिले. त्या सगळय़ा शंकांची आणि प्रश्नांची उकल आता झाली आहे. इंटरनेटकरील लाइव्ह नाटक ’मोगरा’चा शुभारंभाचा प्रयोग लकवरच होणार आहे. तेजस रानडे यांनी लिहिलेल्या या नाटकात अभिनेत्री स्पृहा जोशी आहे. या नाटकाचा टीझर गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. लॉकडाऊनच्या या काळात अशाप्रकारे इंटरनेटवरून सादर होणाऱया या नाटकाबद्दल मराठी रसिकांमध्ये फार उत्सुकता आहे.
हे नाटक नेमके कोणते, त्याचा दिग्दर्शक कोण, त्यातील कलाकार कोण, प्रेक्षकांनी ते नेमके कसे पाहायचे, लॉकडाऊनच्या या काळात सर्व चित्रपट-नाटय़गृहे बंद असताना सरकारकडून प्रयोगांना परवानगी कशी मिळाली, या आणि अशा अनेक प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
अनेक आव्हाने पेलत रंगभूमीने आणि रंगकर्मींनी मराठी नाटक जिवंत ठेवलं आहे. मायबाप प्रेक्षक मराठी रंगभूमीने पेललेल्या प्रत्येक आव्हानाच्यावेळी खंबीरपणे नाटकाच्या मागे उभे राहीले आहेत. यावेळीही ते ’मोगरा’च्या प्रयोगाच्या मागे उभे राहतील, याची पूर्ण खात्री ठेवत हा अनोखा प्रयोग सादर होणार आहे. – हृषिकेश जोशी

























































