
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत केंद्र सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे घरात बसून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र यादरम्यान ऑनलाईन कोर्सेस पूर्ण करण्याची मोठी संधी आहे. अनेकांनी विविध कोर्स ऑनलाईन शिकण्याचा धडाकाच लावला आहे. पाकशास्त्र असो किंवा भाषाशास्त्र, संगणक असो किंवा खगोलशास्त्र विविध प्रकारचे ऑनलाईन कोर्स सध्या उपलब्ध आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कोर्सचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सांगितले आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना कामावर परतल्यावर त्याचा उपयोग होईल. तर अनेक जण आपल्याला आवडणारे कोर्स पूर्ण करीत आहेत.
मायक्रोसॉफ्टचे कोर्स
मायक्रोसॉफ्ट एक्ससेल, पॉवर पॉईंट, शिकण्यासाठी मोठी संधी आहे. कंपन्यांमध्ये प्रेझेंटेशन देण्यासाठी याचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. प्रेझेंटेशन अधिक प्रभावी होण्यासाठी पॉवर पॉईंट शिकल्यास नक्कीच फायदा होईल.
संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच भाषा शिकण्याची संधी
अनेकांना भाषा शिकण्याची आवड असते. अशा लोकांना लॉकडाऊनमध्ये मोठी संधी आहेत. भाषा शिकण्यासाठी अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. त्यासोबत यूट्यूब चॅनेल्स ही मदत करू शकतात.
खगोलशास्त्र आणि आकाश निरीक्षण
पुण्यातील ‘संशोधन’ नावाच्या संस्थेने खगोलशास्त्र आणि आकाश निरीक्षण यामध्ये आवड असणाऱ्या लोकांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम आणला आहे. 25 एप्रिल ते तीन मे या कालावधीमध्ये खगोलशास्त्र या विषयाशी निगडीत अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवला जाणार आहे ज्यांना या विषयाची आवड असेल त्यांनी 9922730551 या क्रमांकावर संपर्क साधावा.

























































