परळीत मंगळवार झाला बाजार वार; ना दुकानासमोर मार्किंग, ना सोशल डिस्टन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळीत तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा नागरिकांनी मोठा गैरफायदा घेतल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी 7 वा. दुकान उघडताच नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती.यावेळी कपड्याचे दुकान,चपलांचे दुकान आणि इतर दुकानात नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग चे तीन-तेरा वाजवल्याचे दिसून आले.एरवी परळी सोमवार हा बाजार वार असतो मात्र आज मंगळवारीच शहराला बाजराचे स्वरूप आले होते.

जिल्हाधिकारी बीड यांच्याकडुन आज काही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली यामध्ये चप्पल ,कपडा ,भांडे,फर्निचर या दुकानांचा समावेश होता.ही दुकाने गेले दीड महिन्यापासून बंद असल्याने या दुकानांत ग्राहकाने मोठी गर्दी केली.यापैकी बहुतांश दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर कुठल्याही प्रकारची मार्किंग केलेली नव्हती यामुळे या दुकानांत खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून आली.तसेच नागरिक रस्त्यावर दुचाकी घेऊन उतरल्याने अनेक ठिकाणी रस्ता जाम झाला होता.एकंदरीत प्रशासनान दिलेल्या आदेशाचे पालन परळीत झाले नसल्याचे यावेळी दिसून आले.