
लॉकडाऊनमुळे प्रत्येक जिल्ह्यात इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत मजुरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिल्यानंतर आता मजूर आपल्याला आपल्या गावी परतु लागले आहे.प्रशासनाच्यावतीने एसटी बसची सोय केली जात आहे तालुक्यात उत्तरप्रदेश येथून आलेल्या 30 मजूर आलेले होते या मजुरांना जाण्यासाठी तालुका प्रशासनाने तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बसची सोय करून 16 मे रोजी सकाळी त्यांना मानवत येथून संभाजीनगर येथे पाठविण्यात आले. गेल्या खूप दिवसापासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या मुळे प्रत्येकी तालुक्यात जिल्हास्तरावर इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत. या मजुरांचे हाल होत असल्याने सदरील मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी शासनाने दिली. आरोग्य तपासणी करून मजुरांना त्यांच्या गावी पाठवले जात आहेत. त्यांची प्रवासाची सोय महामंडळाच्यावतीने केली जात असून मानवत येथे तीस मजूर अडकून पडले होते. या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी तहसीलदार डी.डी. फुपाटे, नायब तहसीलदार नकुल वाघुंडे, न.पा.चे. मुख्य अधिकारी उमेश ढाकणे, मानवत बस स्थानकाचे प्रमुख धोंडीबा जाधव, गोपनीय शाखेचे नारायण ठमके यांनी मजुरांसाठी बसची व्यवस्था केली होती. डॉ.ललित कोकरे. वैद्यकीय अधिकारी,श्री.सुनिल खरात,.ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांची शहरातील बसस्थानक येथे थरमल तपासणी करुन मजुराना सकाळी बसमध्ये बसवुन संभाजीनगर येथे पाठवून दिले आहे. संभाजीनगर येथून विशेष रेल्वेने हे मजूर उत्तर प्रदेशला रवाना होणार आहे.





























































