
लोकडाऊनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अभिनेते वैभव मांगले एक भन्नाट मालिका घेऊन येत आहेत. या मालिकेचे नाव आहे ‘एक गाव भुताचा’. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे गावात ही मालीका चित्रित करण्यात येत आहे. या मालिकेचे झी मराठी या वाहीनीवर गुरूवारपासून प्रसारण सुरू झाले आहे. एक गाव भुताचा ही मालिका मेक इन रत्नागिरी ठरली आहे.
संगमेश्वरी बोलीत रत्नागिरीचे ग्रामीण जीवन दाखविणारी ही मालिका लॉकडाऊनमध्ये स्थानिक कलाकारांसाठी सुवर्णसंधी ठरली आहे. कलाकार,तंत्रज्ञ हे रत्नागिरीचे असून रत्नागिरीतच त्याचे चित्रिकरण होत आहे. निर्माते सुनील भोसलेंसह निर्मितीप्रमुख म्हणून प्रफुल्ल घाग यांनी जबाबदारी स्वीकारती. मालिकेचे लेखन राजू घाग, कॅमेरामन प्रसाद पिलणकर, दिग्दर्शक व एडीटींगची जबाबदारी निखिल पाडावे यांनी पार पाडली.स्वतः वैभव मांगलेंसोबत प्रफुल्ल घाग,अमोल रेडीज, प्रभाकर डावूल, सुनिल बेंडखळे, सचिन काळे, वैदेही पटवर्धन, ऐर्श्वया पाटील, रक्षिता पालव, अर्चना पांचाळ, गजानन पांचाळ, स्वानंद गाडगीळ, समीर इंदुलकर, विनोद वायंगणकर, अर्चना जोशी, अनुया बाम, राजेश गोसावी, ऋषिकेश शिंदे व सहकारी कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे.




























































