शेवंताने सांगितले आवडते योगासन!

1397

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेकंता या  भूमिकेने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईत बनलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्का नेमळेकर. शूटिंग बंद असल्याने सध्या अपूर्का सोशल मीडियाकर बऱयापैकी सक्रिय आहे. आपले मॉडर्न लुकमधील फोटो, बालपणीच्या आठवणी, वेगेवेगळ्या रेसिपीज ती चाहत्यांसोबत शेयर करत असते. चाहतेदेखील तिच्या पोस्टवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. नुकतेच अपूर्काने एक फोटो पोस्ट करत आपल्या आवडत्या योग प्रकाराबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. या फोटोत अपूर्का जांभई देताना दिसत आहे. सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये ती गंमतीत म्हणाली, ’आळस हे एकच योगासन मी दररोज न चुकता करते’. सोबत तिने क्वारंटाईन लाईफ हे हॅशटॅग वापरले आहे. तिची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून अनेकांनी आपले अनुभव कमेंटमध्ये मांडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या