झूमकारचे विविध शहरांमध्ये पुन्हा काम सुरु; ‘झूम टू आत्मनिर्भरता’ अंतर्गत रेंटल बुकिंग्सवर 100 टक्के सवलत

377

मोबिलिटी प्लॅटफॉर्म असलेल्या झूमकारने विविध राज्यांतील 35 शहरांमध्ये पुन्हा काम सुरू केले आहे. 4.0 च्या लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व लक्षात घेता झूमकारने आज ‘झूम टू आत्मनिर्भरता’ हा सेल सुरू केला आहे. याद्वारे ग्राहकांना सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर असे परिवहनाचे वैयक्तिक पर्याय उपलब्ध करण्यास मदत केली जात आहे.

‘झूम टू आत्मनिर्भरता सेल’मध्ये झूमकार 26 ते 29 मे 2020 दरम्यान केलेल्या सर्व शॉर्ट टर्म रेंटल बुकिंग्सवर 100 टक्के सवलत ( सुरुवातीच्या बुकिंग रकमेवर फ्लॅट 50% ऑफ आणि 50% कॅशबॅक.) देईल. ZAN१०० हा कोड वापरून ग्राहक 1 जून ते पुढील तारखेपर्यंत बुकिंग करू शकतात. तसेच सर्व बुकिंग्जवर अमर्याद काळापर्यंत मोफत रिशेड्युलिंगची सोय असेल. ज्या ग्राहकांना दीर्घकाळासाठी कार हव्या असतील, त्यांना अगदी परवडणा-या दरात 13 आणि 6 महिन्यांचा कालावधी सबस्क्राइब करता येईल. प्रत्येक ट्रीपनंतर कारचे सूक्ष्मरित्या निर्जंतुकीकरण केले जाईल. झूमकार एआय आणि एलओटी यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना त्यांच्या कारसाठी १०० टक्के कीलेस कारची सुविधा देते. तसेच सर्वच लोकेशनला संपर्कविहीन कार पिकअप आणि ड्रॉपची सुविधाही देते.

आपली प्रतिक्रिया द्या