लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

निवडणूक समन्वयक पुढीलप्रमाणे ः किशोर पोतदार (पालघर लोकसभा), सुनील वामन पाटील (पालघर लोकसभा),  सुभाष म्हसकर (पालघर लोकसभा), राजू पाटील (शिर्डी लोकसभा), जगदीश चौधरी (शिर्डी लोकसभा), राजाराम बाणखेले (शिर्डी लोकसभा).